Ban on conversion : फाळण्या टाळण्यासाठी ‘धर्मांतरबंदी’ आवश्यक !
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी संकलित केलेला मराठी लेख ....
प्रस्तावना : भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. हिंदूंसाठी भारत आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाला. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यानंतर खर्या अर्थाने हिंदूंसाठी असलेल्या भूप्रदेशात हिंदूंचे रक्षण करणे, हे सरकारचे नैतिक दायित्व आहे; पण अद्यापपर्यंत कुठल्याच सरकारने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. आज सरगना जलालुद्दिन (छांगुर बाबा) सारखे लोक मोकाटपणे धर्मांतराचे रॅकेट चालवतात, आफताबसारखा धर्मांध श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवतो, ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी दबाव आणणार्या मिशनर्यांना कंटाळून लावण्या, ऋतुजा यांसारख्या हिंदु मुली स्वतःचे आयुष्य संपवतात. ‘लव्ह जिहाद’ची घटना उघडकीला आली नाही, असा एकही दिवस जात नाही; तरीही यावर कोणतीच कठोर उ...
