Balaji Patil ; बालाजी पाटील घोरबांड यांच्या कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
उस्माननगर l उस्माननगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित व्यापारी बालाजी दशरथ पाटील घोरबांड यांच्या वतीने येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांसह पत्रकार, शैक्षणिक, राजकीय , सामाजिक क्षेत्रात आणि पोलिस व महसूल प्रशासनात राहून सामाजिक बांधिलकी जोपासून सेवा हीच ईश्वर सेवा समजून विधायक कार्यक्रमात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित मान्यवरांचा श्री महारूद्र मंदिरात आयोजित हरीनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील काल्याच्या किर्तन सोहळ्यात महापुरुष व देवतांची फोटो आणि शाल , श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करून गौरव करण्यात आला.
येथील श्री महारूद्र मंदीरात नुकताच अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवत कथाकार म्हणून साध्वी अमृतानंद सरस्वती माताजी अकोळनेर जि.अहमदनगर यांच्या रसाळ वाणीतून कथा ऐकण्यासाठ...
