Balaji Bhise ; सरपंच संघटनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी बालाजी भिसे तर उपाध्यक्षपदी निलेश कुमरे यांची बिनविरोध निवड
किनवट, परमेश्वर पेशवे l सरपंच संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक बोधडी बुद्रुक येथील अंध विद्यालयात सरपंच पंडित व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली असून या बैठकीत संघटनेची नुतन तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बोधडी बु चे सरपंच सरपंच बालाजी भिसे यांची तर उपाध्यक्षपदी धानोरा ग्रामपंचायतचे सरपंच निलेश कुमरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
किनवट तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन तालुका कार्यकारणी गठीत करण्याच्या अनुषंगाने 11 फेब्रुवारी रोजी बोधडी बु येथील अंध विद्यालयात सरपंचांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सांगोपांग चर्चा करून नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सरपंच संघटनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी बोधडी बु ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी रामराव भिसे, तालुका उपाध्यक्षपदी निलेश कुमरे व स्वप्न...
