Badlapur school sexual assault incident protested ; बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार घटनेचा महाविकास आघाडीकडून नांदेडमध्ये निषेध – NNL
नांदेड | बदलापूर शाळेमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील व इतर मुलीं व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत आरोपीला त्वरित कार्यवाही करून फाशी देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडी नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि. 24 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मागणी केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बदलापूर व इतर ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील काँग्रेस कार्यालय आणि आयटीआय महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर या घटनेचा हाताला काळ्या रिबीन बांधून तीव्र निषेध नोंदवला. तसेच रेल्वेस्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून या घटनेत न्याय मिळावा, अशी मागणी केली.
जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून बदलापू...
