MLA Chikhlikar : शिक्षक नेते बी वाय चव्हाण यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात आमदार चिखलीकरांची चौफेर फटकेबाजी
लोहा| लोहा कंधार एकत्रित तालुका असताना माझे वडील गोविंदराव पाटील ,माजी सभापती व्यंकटराव मुकदम, लोह्याचे माजी सरपंच यशवंतराव चव्हाण यांनी दीर्घकाळ एकत्रितपणे कार्य केले. आता चव्हाण कुटुंबातील दुसऱ्या तिसऱ्या पिढीतही आमच्या सोबत एकत्रित यायला काहीही हरकत नाही. चव्हाण कुटुंबियातील कोणाचीही "सेवानिवृत्त " असो मला बोलवा मी येत जाईल. या भागातील मतदार संघातील जनतेनी "चांगला माणूस" म्हणून मला एवढया अटीतटीच्या काळात निवडून दिले अशी खुमासदार शैलीत फटकेबाजी करत त्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी वाय चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. आता सेवानिवृती नंतर "घडी" बांधण्याची योग्य वेळ आहे असे जाहीरपणे निमंत्रण दिले.
जिल्हा परिषद प्रशाला धावरी येथील मुख्याध्यापक बालाजी यशवंतराव चव्हाण यांच्या सेवानिवृती गौरव सोहळा शहरातील राधाई मंगल कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या अध्यक्षतेखाली पार पडला...
