Mrs. Sharvari Bhojankar : कु. शर्वरी भोजनकर यांचा राजभवन मुंबई येथे सन्मान
हदगांव, शेख चांदपाशा| भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याण महोत्सव समिती, महाराष्ट्र शासनातर्फे 20 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख 5 हजार सरकारी, निमसरकारी आणि खासगी शाळांतील एकूण 1 कोटी 16 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महावीर स्वामींच्या शाश्वत कल्याणकारी तत्त्वांचे जागतिक महत्त्व समजावून देण्यासाठी या भव्य मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यासाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, तसेच राज्यस्तरीय तीन पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले.
यामध्ये उमरखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी व हदगाव येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरुषोत्तमराव भोजनकर यांची नात कु. शर्वरी प्रज्ञान भोजनकर हिने राज्यस्...
