Farmers Asud Morcha : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी असूड मोर्चा – NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्यात युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वराज्य पक्षाच्या आयोजनात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी असूड मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नांदेड येथून झाली आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे समाप्त झाला. या मोर्चात शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या सरकारच्या कानावर घालण्यात आल्या, ज्यात पिकांचे भाव, नुकसान भरपाई आणि विविध योजनांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता.
या मोराचातील मुख्य मागण्या सोयाबीनसाठी ₹8,500 प्रति क्विंटल दर मिळावा, कापूससाठी ₹11,000 प्रति क्विंटल दर मिळावा, ऊसासाठी ₹3,500 प्रति टन दर मंजूर करावा, तिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 72 तासांच्या आत देण्याचे आश्वासन दिले असताना अद्याप ती देण्यात आलेली नाही, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, प्रधान...
