assertion of the literary Devidas Phulari : दुर्जनांचा दुष्टपणा संपावा हे पसायदानाने शिकवले – साहित्यिक देविदास फुलारी यांचे प्रतिपादन -NNL
नांदेड| गीतेमध्ये दृष्टांचा संहार करण्याची परिभाषा येते. परित्राणाय साधूनाम किंवा अभ्युत्थानम अधर्मस्य हे संबोध दुष्टांनाच संपवण्याची भाषा करतात. पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान जे मागितले ते अद्वितीय आहे. खळांची व्यंकटी सांडावी आणि सत्कर्मी रती वाढावी हे मानवतावादी विचार ज्ञानेश्वराने पसायदानात मांडले आहेत.
दुष्ट दुराचारी पण जगले पाहिजेत पण दुष्टातील दुष्टपणा निघून जावा असा मानवतावादी विचार पसायदानात येतो.एकूणच गीतेच्या तत्त्वज्ञानात ज्ञानेश्वरांनी मानवतावादाची भर घातली असून दुराचारी माणसे संपू नयेत तर त्यांचा दुष्टपणा संपावा हे समाजाला ज्ञानेश्वरांच्या पसायदाराने शिकवले. दुर्जनाचा दुष्टपणा संपावा त्याच्यातला निखळ माणूस उन्नत व्हावा हे पसायदानाने शिकवले असे प्रतिपादन साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले. फलटण जिल्हा सातारा येथील गोविंद काका उपळेकर संस्थानमध्ये आयोजित केलेल्या ...
