Action against bogus doctors : बोगस डॉक्टरा विरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उघडताच अनेक बोगस डॉक्टर झाले भूमिगत
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुका हा अतिदुर्गम भाग असल्याकारणाने अनेक बोगस डॉक्टरांनी (Action against bogus doctors) वाडी तांड्यामध्ये आपले प्रस्थ निर्माण केले असून भोळ्या भाबड्या गोरगरीब आदिवासी बहुल असलेल्या भागामधून ही बोगस डॉक्टर मंडळी मोठ्या प्रमाणात जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची विदारक चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच गेल्या सात ते आठ वर्षापासून दहा हजार लोकसंख्या असलेल्या इस्लापूर शहरांमध्ये एका बोगस डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टिस मोठ्या जोमाने थाटली होती.
याप्रकरणी किनवट तालुक्यातील इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एक बोगस मुन्नाभाई वैद्यकीय व्यवसाय करत असल्या बाबतची तक्रार मा. डॉक्टर डी. यु .वांगे प्रबंधक महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नरिमन पॉईंट मुंबई ट्वेंटी यांच्या कार्यालयात प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 2 जानेवारी 2025 च्या पत्राअन्वये...
