Shirdi Padayatra : उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड शहरात आगमन : ठिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड| संत श्री दासगणू महाराज यांच्या कृपा आशीर्वाद लाभलेल्या उमरी ते शिर्डी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून काल रविवारी यात्रेचे नांदेड शहरात आगमन झाले. विविध सामाजिक धार्मिक संस्थांनी ठिक ठिकाणी उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले.
मराठवाड्यातुन मानाची असलेली उमरी ते शिर्डी ही पदयात्रा पालखी स्वरूपात असून मागील १४ वर्षापासून यात्रेचे आयोजन करण्यात येते. आनंदी दास देशमुख यांनी बाबा टायर्स येथे साईं पालखीचे पुष्पवृष्टी करून मोठे स्वागत केले...चहा, बिस्कीट अल्पोपहार देऊन आशीर्वाद घेतला. दरम्यान यात्रा झुलेलाल बाबा मंदिर येथे नतमस्तक झाली. वाजेगव येथे खा रवींद्र चव्हाण यांनी यात्रेला भेट दिली. यात्रेचे त्यांनी स्वागत केले.
शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिर येथे पालखीची आरती करण्यात आली, स्वागत झाले. साई भक्त तथा नांदेड मर्चंट को ऑपरेटिव्ह सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते...
