नांदेडक्राईम

Crime ; आरोपीतांकडुन 01 गावठी पिस्टल, 02 जिवंत काडतुस 03 मोटार सायकल जप्त: स्थानिक गुन्हे शाखाची कार्यवाही

नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, आर. व्ही. वाहुळे सहा. पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. नांदेडच्या विशेष पथकाने स्था.गु.शा. नांदेड विशेष पथकातील पोउपनि दासरे, सपोउपनि करले, पोकों देविदास चव्हाण, पोकों मोतीराम पवार, पोहेकॉ/दिलीप चंचलवार, पोहेकॉ मिलींद नरबाग, सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ राजु सिटीकर, दिपक ओढणे यांच्या सहकार्याने आरोपी अंकुश रामदास भगत वय 19 वर्ष, रा. रत्नेश्वरी नगर, माळटेकडी नांदेड (मोटार साकयल चोरी), 02. शैलेश किशन जाधव वय 19 वर्ष, रा. राजनगर, नांदेड (अवैध अग्नीशस्त्र बाळगणारा) यांना स्प्लॅन्डर प्लस कंपनीच्या 03 मोटार सायकल एकुण किंमत 1,25,000/-रूपये 02. एक गावठी पिस्टल (कट्टा) व 02 जिवंत काडतुस किंमत: -32,000/- रू एकुण 1,57,000/- रूउपायचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत तसेच अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती काढुन कायदेशीर कार्यवाही करणे बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांचे आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

त्यावरून दिनांक 09.07.2025 रोजी सपोनि रवि वाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडुन माहिती घेतली असता आरोपी नामे अंकुश रामदास भगत याने वेगवेगळ्या ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यावरून सदर आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने सोनखेड तसेच भाग्यनगर, नांदेड हद्यीत 03 मोटार सायकल चोरी केले बाबत सांगीतले. त्याचे ताब्यातुन चोरी केलेल्या स्प्लॅन्डर प्लस कंपनीच्या 03 मोटार सायकल जप्त करून सदर आरोपीस पुढील कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशन सोनखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच आज दिनांक 10.07.2025 रोजी सपोनि रवि वाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडुन माहिती घेतली असता शैलेश किशन जाधव रा. राजनगर, नांदेड हा राजनगर परिसरात गावठी कट्टा बाळगुन असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल (कट्टा) व 02 जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त करून सदर आरोपीस पो.स्टे. शिवाजीनगर, नांदेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर दोन्ही कारवाई मध्ये दोन आरोपीकडुन एकुण 1,57,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button