Shri Parmeshwar Mandir ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या आजीव सदस्यपदी अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची निवड
हिमायतनगर,परमेश्वर काळे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान ट्रस्टमध्ये तात्पुरते सदस्य म्हणून कार्यरत असलेले अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची आता आजीव सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हि निवड गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली असल्याचे मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी जाहीर केले आहे.
विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात हरिहर अवतारात श्री परमेश्वराची उभी मूर्ती आहे. सर्वांग सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती भारतात इतरत्र कुठेही आढळून येत नाही असे आत्तापर्यंत मंदिरास भेट दिलेल्या अनेक साधू, संत महंत व जुने जाणकार मंडळी सांगतात. श्री परमेश्वर मंदिराचा कारभार ट्रस्ट कमिटीच्या माध्यमातून परंपरेनुसार चालविला जात असून, सामाजि...
