Farmers : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी चिंता
Farmers in Nanded district are happy in some places and worried in others due to rain नांदेड,अनिल मादसवार| जिल्ह्यात काल बुधवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे रान शिवारात कोवळी सोयाबीनचे पिके वाऱ्यावर डोलू लागली आहेत. या पिकांना पाहून शेतकरी आनंदात असले तरी काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन अश्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देऊन हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे.
मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता, दरम्यान काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करूनही पिके उगवली नाहीत. त्यामुळे देगलूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. आता तेथील शेतकरी दुब...
