स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात -NNL
नांदेड। नूतन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, इतवारा अति पदभार नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पोलीस ठाणे अंतर्गत सतत पेट्रोलींग ठेऊन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरून स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात घेतले आहे.
सदर सुचनांप्रमाणे मा. परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे श्री. आर. डी वटाने, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकों / दत्तराम जाधव, पोहेको//विजयकुमार नंदे, पोहेकों / मनोज परदेशी, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकों/ बालाजी कदम, पोकों/रमेश सुर्यवंशी, पोकों/ इम्...
