नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस ; वीज कोसळून युवकाचा मृत्यू तर एक बैल व गाय दगावली -NNL
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील गुरुवारी दुपारपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान झाडाखाली थांबलेल्या ठिकाणी वीज कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अन्य एका ठिकाणी वीज कोसळून बैल व गाय दगावली आहे. यंदा पावसाळ्याच्या तोंडावर वीज पडून होणाऱ्या दुर्घटना पाहता नागरिक शेतकऱ्यांनी पाऊस पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली, नायगाव तालुक्यासह परिसरामध्ये दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरावरील टिनपत्रे उडून जाणे व महावितरण कंपनीच्या तारा तुटणे व वीज पोल वाकुन जाणे अश्या घटना घडत आहेत. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिलोली तालुक्यातील तळणी येथे वीज कोसळली असून, कंधार तालुक्यातील येलूर येथील शंकर पंढरी धर्मेकर...
