Do not fall prey to the illusion of the broker | दलालाच्या भुलथापास बळी पडू नये; असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल – NNL
नांदेड| रेशनकार्डवरील नावे कमी करणे, नाव वाढविणे व नवीन शिधापत्रिका काढण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व सेतु सुविधा केंद्रामार्फतच करावीत. याकामासाठी कुठल्याही मध्यस्थाच्या, एजेंटच्या दलालाच्या भुलथापास बळी पडू नये, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे. अशा प्रकारचे असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागू केलेल्या कागदपत्रामध्ये राशनकार्ड आवश्यक आहे. यामुळे राशनकार्डात नाव टाकणे, वगळणे व नवीन राशनकार्ड काढणे याबाबत कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालयाच्या आवारात काही दलाल कार्डधारकास भुलथापा देऊन व आर्थिक पिळवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिनांक 11 जुलै रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी कार्डधारक आले असता तहसिलदा...
