नांदेडसोशल वर्क

Vanchit : वंचितच्या आंदोलनाला यश; 2024च्या 12,240 पुरग्रस्त लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा

नांदेड| 2024 मधील अतिवृष्टी व पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. शासनाकडून निधी प्राप्त होऊनही तो पुरग्रस्तांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने आवाज उठविण्यात आला.

याच मागणीसाठी प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणा दरम्यान प्रशासनाशी झालेल्या चर्चेत पुरग्रस्तांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाईल, असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले होते.

आज त्या आश्वासनाची पूर्तता झाली असून, एकूण 12,240 पुरग्रस्त लाभार्थ्यांच्या (11,750 + 490) खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. हे यश हे वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि जनतेच्या समर्थन व एकजुटीचे फलित आहे. वंचित बहुजन आघाडी प्रशासनाचे आभार मानते, मात्र अजूनही जे 2024 व 2025 चे जे पुरग्रस्त शिल्लक आहेत त्यांना मदत पोहोचेपर्यंत संघर्ष सुरू राहील.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button