Nana Patole : शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले
मुंबई| देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत ८७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
कृषी विभागातील घोटाळ्याचा पर्दाफाश करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकामागोमाग एक घोटाळा उघड करत आहेत. नाना पटोले यांनी आज नॅनो युरीया व नॅनो DAP खरेदीमधील घोटाळ्याचा पर्दाफाश केला आह...
