Agricultural Schemes Jagar from Krishi Varkari Dindi | “कृषी वारकरी दिंडी मधून कृषी योजनांचा जागर” – NNL
नांदेड| तालुक्यातील मौजे जैतापूर तालुका नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांचे सूचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त कृषी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीमध्ये गावातील महिला व पुरुष वारकरी भजनी मंडळ, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी यांचा सहभाग होता. यांच्यासोबत कृषी विभागातील विविध योजनेचे फ्लेक्स, माहितीपत्रक, पताका घेऊन हरिनामा सोबत कृषी विभागातील योजनांच्या घोषणा देत दिंडी संपूर्ण गावभर फिरून दिंडी काढण्यात येऊन कृषी योजनांचा जागर करण्यात आला.व शेवटी दिंडीचे शेतकरी मेळाव्यात रूपांतर करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी नांदेड सिद्धेश्वर मोकळे यांनी कृषी वारकरी दिंडी, कृषी योजनांचा जागर या कार्यक्रमाच्या प्रयोजनाविषयी प्र...
