Let’s go to Mumbai: आता पत्रकारांचेही “चलो मुंबई” — पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक
मुंबई| राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पत्रकार संघटना आता रस्त्यावर उतरणार आहेत. विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” च्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित बैठकीत “चलो मुंबई”चा नारा देत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबई, अमरावती यासह राज्यातील पत्रकारांवरील झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ म्हणून पारित झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने तातडीने नोटिफिकेशन काढावे, असा ठराव या बैठकीत संमत झाला.
📅 आंदोलनाचा आराखडा : 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राज्यभरातून हजारो एस.एम.एस. पाठवून मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल. 25 नोव्हेंबर...
