Naseem Khan : पोलीस अधिकारी व बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत: नसीम खान -NNL
मुंबई| मुंबई महानगरपालिका आणि पवई पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी बिल्डरशी संगनमत करून ६ जूनच्या पहाटे जयभीम नगरमधील गरीब कुटुंबांच्या घरावर कारवाई करून त्यांना बेघर केले. या कारवाईतील बीएमसी अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करून पोलीस उपायुक्त, एस वार्डचे वार्ड अधिकारी, पालिका उपायुक्त आणि पवईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीचा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान यांनी पुन्नरुच्चार केला आहे.
यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली नियमबाह्य कारवाई करून पवईच्या जयभीम नगर मधील ६०० कुटुंबियांना भर पावसाळ्यात बेघर करण्यात आले. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते, आज एसआयटीच्या अहवालावर सुनावणी करताना क...
