लोहा विधानसभा प्रतापराव पाटील चिखलीकरांनी लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह – NNL
लोहा| नांदेड लोकसभा मतदार संघात प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. थोडी तीस -चाळीस हजार मतांची मेहनत घेतली असती तर साहेब खासदार झाले असते अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून, आपण केलेला हलगर्जीपणा आपल्यासाठीच त्रासदायक ठरले आहे. याची जाणीव झाल्यानंतर कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत. त्यांनीं लोहा विधानसभा मतदार संघात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली असून, पत्रकार परिषद घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील व माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड मध्ये पराभूत झाल्या नंतर त्यांनी विधानसभा निहाय आढाव बैठका घेतल्या. आपल्या होम पिचवर लातूर लोकसभा मतदार संघाचा आढावा तसेच कार्यकर्त्...
