Thursday, May 14

Tag: a grand welcome by the youth group

Shivani news : बीएसएफ व सीआरपीएफमध्ये निवड झालेल्या जवानांचे नवयुवक मंडळाकडून जंगी स्वागत

Shivani news : बीएसएफ व सीआरपीएफमध्ये निवड झालेल्या जवानांचे नवयुवक मंडळाकडून जंगी स्वागत

नांदेड, करियर
शिवणी, भोजराज देशमुख | किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवणी गावाने देशसेवेसाठी दोन शूर जवान दिल्याने गावाचा नावलौकिक तालुका व जिल्हास्तरावर झळकला आहे. शिवणी येथील साईनाथ बेलयवार यांची सीमा सुरक्षा दलात (BSF) तर अजय धुमाळे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही जवानांनी आपले कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून पहिल्यांदाच जन्मगावी आगमन केल्याने, नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण शिवणी गाव देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेले होते. शिवणीसारख्या दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेत, जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमांच्या जोरावर साईनाथ बेलयवार व अजय धुमाळे यांनी हे यश संपादन क...
error: Content is protected !!