Mata Vasavi ; माता वासवी जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन
नवीन नांदेड़ l माता वासवी जन्मोत्सव निमित्त वासवी व वनीता क्लब सिडकोच्या वतीने दिनांक 7 में रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भजनी मंडळ, महिला दांडीया, आतिषबाजी, व ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रोप्य महोत्सवी वर्ष असून. 7 में रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता माता वासवी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने वासवी व वनिता क्लब यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, ही शोभायात्रा दत कृपा मंगल कार्यालय हडको, इंदिरा गांधी हायस्कूल हडको मार्ग डॉ.कलंत्री दवाखाना,ज्ञानेश्वरनगर - पाण्याची टाकी छ. शिवाजी महाराज चौक डॉ. रायेवार हॉस्पिटल समोरुन शिवमंदिर सिडको येथे या यात्रेचा समारोप होणार आहे,या जयंती सोहळ्याला डायमंड केसीजिएफ ऐरूकुल्ला रामकृष्ण,व्हाईस केसीजिएफ सौ.सुनिता सतिश वट्मवार यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
समारो...
