University students performed in a play : विद्यापीठातील विद्यार्थी रंगले नाट्यवाचनात ; ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचा आनंददायी वाचन सोहळा -NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत नुकतेच नाट्यसंहिता व ललित साहित्याचे अभिवाचन या वाचन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी होते. तर डॉ. नीना गोगटे, डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर व प्रा. राहुल गायकवाड यांची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभागाच्या विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमात कृष्ण चंदर लिखीत व भारत सासणे अनुवादीत ‘उघडा, दरवाजे उघडा’ या मुळ उर्दु नाटकाच्या संहितेचे वाचन केले. यावेळी वाचणारे विद्यार्थी व ऐकणारे रसिक दोघेही नाट्यवाचनात रंगून गेले होते. नाटकातील मिश्कील प्रसंगाच्या वाचनादरम्यान विद्यार्थी व...
