DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त
नांदेड/लातूर | लातूर शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १ लाख ४१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
DIG शहाजी उमाप यांनी अवैध जुगार व मटका व्यवसायावर आळा घालण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर शहरात पाठविले होते. सदर पथकाने दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी शाहू चौक ते गंजगोलाई रोडवरील गोजमगुंडे कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या मटका बुक्कीवर छापा टाकला.
या कारवाईत विजय उद्धवराव लांडगे (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) या मटका बुकी चालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून नगदी १,४१,००० रुपये, ३ मोबाईल फोन असा एकूण १,७५,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
बुक्कीमधून जप्त...
