Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी
- बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल?
- नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी 3 लाख कोटींचा सामंजस्य करार
- 92,235 रोजगार निर्मिती
दावोस| दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minis...
