Saturday, June 27

Tag: 74.75 percent voting

Municipal Council : जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 74.75 टक्के मतदान

Municipal Council : जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 74.75 टक्के मतदान

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी तसेच थेट अध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. जिल्ह्यातील 291 मतदान केंद्रावर 92 हजार 48 पुरुष तर 90 हजार 354 महिला व इतर 7 असे एकूण 1 लाख 82 हजार 409 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. अध्यक्ष पदासाठी 71 तर सदस्य पदासाठी 873 उमेदवारांसाठी जिल्ह्यातील सामान्यासह नागरिकांसह दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी, महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच जिल्ह्यात 10 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीसाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यत मतदान सुरु होते. सामान्य नागरिकांसह महिला, दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी यांनी उत्साहाने मतदान केले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल ...
error: Content is protected !!