Sri Ganga Hospital ; श्री गंगा हॉस्पिटलमध्ये ५ व्यांदा यशस्वी किडनी प्रत्यारोपण -NNL
नांदेड। येथील शिवाजीनगर भागातील श्री गंगा हॉस्पिटल येथे श्रीमती सुरेखा अशोक दराडे यांना किडनी प्रत्यारोपणानंतर यशस्वीरित्या नुकताच डिस्चार्ज देण्यात आला असून श्री गंगा हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने अधिक माहिती देताना सांगितले की किडनी दाता आणि रुग्ण दोघेही उत्कृष्ट क्लिनिकल स्थितीत आहेत सदरील रुग्णांस मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतही मिळवून देत केले किडनी प्रत्यारोपणांस मोठे सहाय्य केले आहे त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले डॉ.शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटलच्या संपूर्ण टिमचे आभार मानले आहेत.
किडनी डोनर व रुग्ण आदी दोघांची प्रकृती चांगली आहे. श्रीगंगा हॉस्पिटलमधील किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांनी किडनी प्रत्यारोपणाबद्दल माहिती देत रूग्णास व दात्यास तयार केले आणि त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली यावेळी डॉ.राजीव राठोड, डॉ.शिवराज टेंगसे या किडनी तज्...
