15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL
"जिथे भाव आहे, ताल आहे, राग आहे अशी माझी भारतमाता" आज "15 ऑगस्ट" आपल्या भारत मातेला प्रथम आपण वंदन करूयात. आपल्या जीवनामध्ये पाच माता खुप महत्त्वाच्या आहेत. 1) भारतमाता 2) भुमाता 3) गोमाता 4) गंगा माता 5) जन्म देणारी आपली आई या पाच मातांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. ते आपण कसेहि फेडू शकत नाही. या माता खुप खुप महान आहेत. यांचे वर्णन आणि स्तुती करण्यास हो आपण साधारण माणसे कमी पडतो या मातांना आपण वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करूयात.
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खुप आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा मोठा सण आहे "15 ऑगस्ट" हा दिवस आपल्या राष्ट्राचा भाग्योदय आणि समाजाला अभय प्राप्त करून देणारा दिवस आहे. कितीतरी मानवपुष्प हसत हसत समर्पित झाले आपल्या या भारत भुमीला स्वतंत्र करण्यासाठी आणि म्हणूनच "15 ऑगस्ट" ची पहाट हि स्वतंत्रता दिवसाची पहाट म्हणून उदयास आली आपली भारत माता गुलामगिरीतून स्वतंत्र झाली. तो ह...
