नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लिमिटेड यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे आणि पुणे येथील स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लिमिटेड चे दिपेश शहा यांच्या पुढाकाराने या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
विद्यापीठातील नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागांने याबाबतीत पुढाकार घेतला आहे. पुणे येथील स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लिमिटेड ही एक सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामध्ये विद्यापीठात विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन, दिल्ली) अनिवार्य केलेला सायबर सिक्युरिटी हा कोर्स शिकवला जाणार आहे. या कोर्सचा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल शाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गिरीश चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सायबर सिक्युरिटी कोर्सचे समन्वयक डॉ. सतीशकुमार मेकेवाड, पुणे येथील स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लिमिटेड चे बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अमोल बागल, प्रोजेक्ट मॅनेजर मिलिंद औटी यांची उपस्थिती होती. या कोर्स संदर्भातील सर्व माहिती विद्यापीठाच्या https://srtmun.ac.in/ announcements / घोषणा या हेड अंतर्गत देण्यात आली आहे.