कंधार ( सचिन मोरे) कंधार तालुका हा ऐतिहासिक राष्ट्रकूटकालीन असून ही भूमी हाजीसय्या व साधु महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भागातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फार मोठा लढा उभारला होता त्यात अनेकांना वीरमरण आले. या संतांच्या भूमीस मी नतमस्तक होतो. या भागाच्या विकासासाठी लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी दिला असून तुम्ही मला साथ द्या लोहा कंधारची नगरपालिका माझ्या ताब्यात द्या भव्य दिव्य आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त व्यापारी संकुल व क्रीडा संकुल उभा करून शहरातील सर्व समस्या सोडवून लोहा कंधार शहराचा कायापालट करण्याची ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली .


शिवाजी चौक कंधार येथे २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन लोहा कंधार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता करण्यात आले होते.

यावेळी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पा. खतगावकर, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे , ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे,सुभाषराव साबणे, माजी जि.प. सदस्य ॲड.मुक्तेश्वर धोंडगे, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पा. होटाळकर, माधव पावडे, प्रा. चित्राताई लुंगारे ,कमलबाई लुंगारे ,बाबुराव केंद्रे उमरगेकर ,सचिन पाटील चिखलीकर ,मन्नान चौधरी, जफरोद्दीन बहोद्दिन ,मनोहर पाटील भोसीकर, नगराध्यक्ष पदाचे कंधारचे उमेदवार स्वप्निल उर्फ हनमंत पाटील लुंगारे ,लोह्याचे उमेदवार शरद पवार, किशनराव डफडे ,मधुकर पाटील डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून एका वर्षामध्ये १३ कोटी रुपयाचा निधी देण्यात आला असून या निधीतून कंधार मध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारक, अण्णाभाऊ साठे स्मारक, कै. गोविंदराव पाटील चिखलीकर उदयान, हाजीसया दर्गा, कंधार शहरातील अंतर्गत मुख्य सी.सी रस्ते यासाठी निधी दिला असून आजही विकास कामे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आम्ही राज्यामध्ये फुले,शाहू, आंबेडकर या विचारधारेने पुढे चाललो आहोत. सर्वांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. माणुसकी मोठी आहे आम्ही जात-पात बाळगत नाही. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्याचा आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करीत असून कंधारची व्यापारपेठ मागील काळात जमीनदोस्त करण्यात आली ती व्यापार पेठ भव्यदिव्य स्वरूपात बांधून कंधारच्या व्यापाऱ्यांना न्याय देणार.

शहरामध्ये भूमिगत ड्रेनेज लाईन, कंधार शहरासाठी पाणी पुरवठ्यासाठी व्यापक योजना, यासह जे काही प्रश्न असतील ते टप्प्याटप्प्याने आम्ही सोडवू, लाडक्या बहिणीने देखील काळजी करू नये असे आवाहन नामदार अजितदादा पवार यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रास्ताविक करताना आमदार चिखलीकर म्हणाले की, कंधार शहरातील जनतेने माझ्या प्रत्येक निवडणुकीत अत्यंत मोलाची साथ दिली असल्याने त्यांच्या भक्कम पाठिंब्यावरच मी आमदार झालो आहे.
कंधार शहराचा विकास करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. कंधार येथे भव्य असे व्यापारी संकुलन उभारून व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कंधारला ६ एकर जागेमध्ये भव्य असे क्रीडा संकुल लवकरच नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून उभारणार, कंधार येथे बौद्ध विहार, घराघरात फिल्टरचे पाणी, व अंडरग्राउंड ड्रेनेज साठी ४०० कोटीचा प्रस्ताव तयार आहे.
कंधारच्या दर्ग्याला आज पर्यंत तर ७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन दर्ग्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. साधु महाराज मठ संस्थान साठी देखील भरीव निधी उपलब्ध करून घेऊ. लोहा कंधारची नगरपालिका माझ्या ताब्यात द्या असे भावनिक आव्हान प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी केले. यावेळी हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.

