हिमायतनगर| कारला येथील सुमित संजय बोंपीलवार याने बारावीच्या परिक्षेत 77 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून कौतुक केला आहे.


इस्लापुर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय चा विद्यार्थी सुमित संजय बोंपीलवार यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यामुळे त्याने बारावीच्या परिक्षेत 77 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या कॉलेज मधून मधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आई वडीलांचे स्वप्न साकार करून माझे ध्येय निश्चित होईपर्यंत पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करणं सुरू ठेवणार असुन माझ्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद आई वडील यांना दिले आहे.


या यशाबद्दल सुमित बोंपीलवार यांचा सत्कार नाथा पाटील चव्हाण, भगवान गुंफलवाड,तंटामुक्ती अध्यक्ष डॉ गफार, डॉ .प्रा.घोडगे ,पोलिस पाटील साईनाथ कोथळकर,सरपंच गजानन कदम,प्रा.मारोती देवकर ,प्रा.ज्ञानेश्वर बोंपीलवार, बालाजी सादुलवार,बालाजी मिराशे, नामदेव बोंपीलवार, सोपान बोंपीलवार,वसंत मिराशे, सचिन बोंपीलवार,अमोल एटलेवाड, नितीन बोंपीलवार यांच्यासह गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.




