कंधार, सचिन मोरे| तालुक्यातील पानशेवडी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर बापूराव पाटील मोरे यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी ऱ्हदय विकाराच्या झटक्याने शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान निधन झाले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते फुलवळ सर्कल प्रमुख म्हणून त्यांनी कामगिरी बजावली तसेच गावखेड्यातील तंटे मिटविण्यात त्यांचा हातखंडा होता त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पानशेवडीचे माजी सरपंच कै.जयवंतराव पा. मोरे यांचे कनिष्ठ बंधू होत.



