भोकर l पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन डीजेमुक्त व पारंपरिक वाद्य लावून शांततामय वातावरणामध्ये गणेश विसर्जन करणाऱ्या चिदगिरी येथील गणेश मंडळ व पदाधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी डी.आर.हाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार व पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव २०२५ मध्ये केलेल्या आव्हानास भोकर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळाने चांगला प्रतिसाद देऊन गणेशोत्सव मिरवणूक दिलेल्या वेळेत पारंपरिक वाद्यांसह डीजेमुक्त पध्दतीने पोलीसांच्या अटी व नियमांचे पालन करुन शांततामय वातावरणात गणेशोत्सव मिरवणूक काढून प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल प्रमानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


यामध्ये चिदगिरी येथील शिवशक्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी अध्यक्ष शंतनू देशमुख, उपाध्यक्ष विराज देशमुख, ओम कल्याणकर, मनोज कदम, योगेश कदम,गौरव देशमुख सह आदी पदाधिकारी यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अजित कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश औटे ,गोपनीय शाखेचे परमेश्वर गाडेकर उपस्थित होते




