नांदेड| आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधीत राखण्यासाठी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अवैध व्यवसायावर कार्यवाही करणे, अजामिनपात्र वॉरंट बजावणी करणे व प्रतिबंध कारवाई तसेच इतर कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे कडून गुन्हेगारांना हद्दपारी व स्थानबध्द सारखी परिनामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. अवैध रित्या मद्यविक्री करणाऱ्या गुन्हेगारावर देखील परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. जामिनपात्र वॉरंट तसेच अजामिनपात्र वॉरंट मधील आरोपीतांना वॉरंट बजावणी करुन कायदेशिर कार्यवाही करण्यात आलेली आहे. भयमुक्त वातावरणामध्ये आगामी निवडणुक पार पाण्याकरीता शस्त्र परवाना धारकाकडे असलेले अग्नीशस्त्र जमा करण्यात आले आहेत. तसेच गोपनिय माहिती काढून अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आलेला आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी बाहेरील एसएसबी, एसएपी, बीएसएफ, सीआरपीएफ, एसआरपीएफ च्या एकुण 10 कंपनी तसेच पोलीस उपअधिक्षक-02, सपोनि / पोउपनि-25, पोलीस अंमलदार-452, प्रशि. पोलीस अंमलदार-400 आणि होमगार्ड-2872 तसेच 372 तसेच नांदेड पोलीस दलातील अधिकारी-200, पोलीस अंमलदार-2700, एनसीसी कॅडेट- 151, एनएसएस- 40 आणि निवृत्त कर्मचारी-100 असा पोलीस बंदोबस्त लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक करीता तैनात करण्यात आलेला आहे.
वरील उपलब्ध मनुष्यबळाकडून पथसंचलन (रुटमार्च), एरिया डॉमिनेशन व इतर निवडणुक अनुषंगाने शांतता अबाधीत राखण्यासाठी एकत्रीत संयूक्तरित्या सर्व पो.स्टे. स्तरावर सुनियोजित पद्धतीने व इतर सूरक्षा विषयक उपाययोजना आचार संहिता कालावधीत राबवीण्यात आलेल्या आहेत. दिनांक 15/10/2024 ते दिनांक 17/11/2024 या कालावधी दरम्यान खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 20/11/2024 रोजी होणारे मतदानाच्या अनुषंगाने नांदेड पोलीस दलाकडून सर्व नागरीकांना खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे. 1) आयोगाने नियूक्त केलेले निवडणूक निरीक्षक तसेच निवडणुकीसाठी प्राधीकृत निवडणूक/पोलीस कर्मचारी वगळता कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्राच्या 100 मिटर परिघामध्ये तसेच मतदान केंद्रामध्ये मोबाईल, कॅमेरा, वायरलेस सेट, ज्वलनशील पदार्थ, नेण्यास प्रतिबंध आहे. 2) गुन्हेगारी घटनेशी सबंधीत व्यक्तींना निवडणुक बुथवर नियूक्त केले जाणार नाही, या बाबतची दक्षता राजकिय पक्ष/उमेदवाराने घेणे आवश्यक आहे. 3) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 134 (ब) नुसार या कलमाद्वारे परवानगी दिलेल्या व्यक्तीव्यतीरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा त्या परीसरात शस्त्र घेवून जाण्यास किंवा शस्त्र दाखवीण्यास प्रतिबंध आहे. 4) मतदान केंद्राच्या 100 मिटरच्या आतील दुकाने, पानटपऱ्या व इतर आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात याव्यात. 5) मतदान केंद्राच्या 100 मिटरच्या आवारात कोणतेही पोस्टर किंवा बॅनर लावण्यात येवू नये. 6) मतदान केंद्राच्या 100 मिटरच्या आवारात यंत्राद्वारे आवाज, गोंगाट किंवा गोंधळ करण्यास परवानगी नाही.
7) मतदान केंद्राच्या बाहेर 200 मिटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणुक बुथ उभारण्यात येवू नये. 8) निवडणुक बुथ उभारण्या करीता निवडणुक निर्णय अधिकारी, आवश्यकते नुसार शासकीय प्राधिकरणे, तसेच स्थानिक प्राधिकरणे, यांच्या परवानग्या घेणे आवश्यक राहिल. 9) असे निवडणुक बुथ शैक्षणीक संस्था किंवा रुग्नालयाच्या परिसरात उभारण्यात येवू नयेत. 10) मतदान केंद्रापासून 200 मिटर परिसरात कोणताही प्रचार अनुज्ञेय नाही. 11) मतदान केंद्राच्या 100 मिटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनास बंदी राहिल. 12) मतदारांना लाच देणे, मतदारावर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाक दपट दाखवीणे, तोतयेगिरी करणे तसेच मतदान केंद्राच्या 100 मिटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहिल.