नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र व्हावे ही मागणी मोठ्या प्रमाणात लावून धरण्यात आलेली आहे. 2023 मध्ये विद्यापीठाने तसा प्रस्तावही तयार करून त्यावर मंजुरी घेतली.


परंतु आजतागायत पुढील कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी आनंद कर्णे यांनी येत्या काही दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे *. त्या संदर्भात आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.


यावेळी बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर, सूर्यकांत विश्वासराव, प्रा.प्रभाकर उदगीरे, डॉ. विशाल बेलुरे प्रा आनंद कर्णे, रविकांत काळे ,विश्वनाथ दासे, काशिनाथ इसातकर राठोड ,कारामुंगे, रत्नाकर कुऱ्हाडे,संगमेश्वर बाच्चे, संतोष घोडके पिंटू बोंबले, केशव खिचडे कविराज केदारे राजू बोंबले कृष्णा पाटील भोशीकर ,नितीन चिंचोलकर ,महारुद्र काळेकर ,गंगाधर भालके ,यासह समता मूलक महात्मा बसवेश्वर यांचे विचार मानणारा अनुयायी तथा बसव ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलगुरू महोदयांनी येणाऱ्या काळात नक्कीच विद्यापीठामार्फत पूर्ण रीतसर प्रस्ताव मंजूर करून देण्याचे आश्वासित केले.




