देगलूर/शहापूर। तालुक्यातील मौजे शहापूर येथील विठ्ठलेशवर सभागृहात नवरात्रोत्सव काळात आयोजित केलेल्या ग्रामसभेत गावातील विविध कामकाजाचे गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.
विशेष बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील बंद असलेली तंटामुक्ती अध्यक्ष निवडण्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्यात आले तसेच तंटामुक्ती समिती मध्ये सरपंच उपसरपंच पोलिस पाटील वैद्यकीय अधिकारी शाळेतील शिक्षक पत्रकार जेष्ठ नागरिक पोलिस कर्मचारी असे तेवीस लोकांचे समिती नेमण्यात आले.
ग्रामसभेत अतीकरमन हटाव घरकुल योजना गोठा पालन शेत तळे यांचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी ग्रामसेवक कोटगिरे यांनी केले. यावेळी सो सरपंच कांबळे उपसरपंच गणेश चामावार मलरेडी यालावार बालाजी शातापुरे अविनाश चितलवार मलनरेडी चितलवार विश्वभर पाटील गगारेडी कोटगिरे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी कनकटे गणेश माडपते राजू मामडे पवन सुरकटे व शाळेचे मुख्याध्यापक सो जडलावार सो देशपांडे यांची उपस्थिती होती.