हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीच्या अपहार प्रकरणी चौकशी न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रामराव दशरथ मनमंदे यांनी सोमवार दिनांक 06 पासून हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास (hunger strike in Kamarwadi) सुरुवात केली आहे.


मनमंदे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती हिमायतनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून कोणताही ठराव न घेता व ग्रामसभेची प्रक्रिया न करता श्रीशा इंटरप्राइजेस या नावाने रू. २,६३,२७२ इतका निधी उचलून अपहार केला आहे.

या प्रकरणी दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या लेखी तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे न्याय मिळावा या मागणीसाठी ते आमरण उपोषणास बसले आहेत. प्रतिलिपी म्हणून तहसीलदार, तहसील कार्यालय हिमायतनगर तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन हिमायतनगर यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.


जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी करून दोशी ग्रामसेवक सरपंचावर कार्यवाही होऊन आपहार केल्याची रक्कम दंडासह शासन खाती जमा करून घेतली जाणार नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषण कर्त्यांनी दैनिक गावकरीशी बोलतांना दिला आहे.


