हदगाव, गौतम वाठोरे| तामसा रोडवरील श्री. साईबाबा निवासी अपंग विद्यालयात २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यानंतर सामाजिक कार्यकर्त्या उपा. वंदनाबाई सदाशिव वाठोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला. या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जगदीश बियानी, राकेश दमकोंडवार, गोटूशेठ लाहोटी, शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. पाळेकर, तसेच डाके सर, वाघमारे सर, वाट्टमवार सर, धडेवार सर, तावडे सर, अधीक्षक भूषण नरवाडे, मुधोळ सर, राठोड सर, गुंडेवाड सर, नल्लामडगे सर, येरेवाड मॅडम, गोवंदे मॅडम यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संविधानाचा संदेश, गीतातून अभिव्यक्ती
कार्यक्रमात पत्रकार गौतम वाठोरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्मितीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती दिली. यावेळी त्यांनी संविधानावर आधारित देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
यानंतर शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी संदेशांनी परिपूर्ण ठरला.


