नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले शेषराव शिंदे व ज्ञानोबा गिते यांच्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली असून नुकतीच महाराष्ट्रातुन ६१० पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयातून पदोन्नती वर नियुक्ती केली आहे.


२०१३ साली पोलीस खाते अंतर्गत सेवा जेष्ठतेनुसार परिक्षा दिली होती, परिक्षा निकाल लागल्या नंतर सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती वर नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्रातुन ६१० पैकी नांदेड जिल्ह्यातील १९ जणांचा समावेश असून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील दोन जणांचा समावेश आहे यात शेषराव कदम,व ज्ञानोबा गिते असून उपनिरीक्षक पदोन्नती बाबत ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे, उपनिरीक्षक भोसले व पोलीसकर्मचारी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


सिडको पोलीस चौकी येथे कार्यरत शेषराव शिंदे पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल दलित मित्र माधवराव अंबटवार,सेवानिवृत्त भुमि अभिलेख ऊप अधिक्षक के.ना. जेटेवाड, शिवसेना ऊबाठा गटाचे माजी शहरप्रमुख निवृत्ती जिकंलवाड, सिडको सराफा असोसिएशन अध्यक्ष अतुल धानोरकर, राहुल गवारे, ज्ञानेश्वर दुंधंबे,दिनेश भरकड,पोलीस कर्मचारी रामदिनंवार,पालीमकर, भागवत फुलारी, अझहर शेख,नदीम शेख, ऊतम काळे,थोरात मामा,राम शिंदे,सुरेंद्र कांबळे,अनुप जोंधळे,गोलु मोरे, ताजोध्दीन शेख,शेख रोशन यांच्या सह सिडको परिसरातील व्यापारी ,नागरीक व नवीन नांदेड पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, छायचित्रकार सारंग नेरलकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
