नांदेड| भोकर येथील दिगंबरराव बिंदू स्मारक समिती भोकर संस्थेचे सचिव शहरातील जेष्ठ नागरिक शेख मुराद मांजरमकर यांचे अल्पशा आजाराने दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता राहते घरी निधन झाले ते 84 वर्षाचे होते.


शांत, संयमी मृदभाषिक अशी शेख मुराद मांजरमकर यांची ओळख होती ते शंकर सहकारी साखर कारखाण्याचे प्रदीर्घ संचालक, उमरी जिनिंग प्रेसिंग सह संस्थेचे व्यवस्थापक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सक्रिय सदस्य, भोकर पाईप कारखान्याचे संचालक अशी विविध पदे उपभोगली होती त्यांचा भोकरच्या राजकारणात प्रभाव होता मांजरमकर यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष माधवराव किन्हाळकर यांनी दुःख व्यक्त केले.

दि.४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे राहते घर सईद नगर/ मंजुळा नगर भोकर येथून अंत्ययात्रा निघून उमरी रोडवरील ईदगाह जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पाच मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते नायगाव येथील पत्रकार मुदखेडकर यांचे चुलत सासरे होत.



