नवीन नांदेड l शिवसेना ऊबाठा गटाच्या नांदेड तालुका दक्षिण प्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक असरजन येथील नंदु पाटील वैघ यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ऊबाठा गटात सक्रिय शिवसैनिक म्हणुन व अनेक पदावार कार्यरत असताना वेळोवेळी आंदोलन ,बैठक, मोर्चा आदी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक मध्येही पक्षासाठी सहकार्य केले,पक्षाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन त्यांची नियुक्ती केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मराठवाडा विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे तसेच शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात व जिल्हाप्रमुख भुंजगराव पाटील डक,उप जिल्हा प्रमुख व्यंकोबा येडे यांच्या नेतृत्वाखाली माजी शिवसेना नांदेड तालुका दक्षिण प्रमुखपदी निवडीबद्दल पक्षप्रमुख व पक्षश्रेष्ठींचे आभार मानुन पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे दिलेला आशीर्वाद व जबाबदारीचा जनसेवेसाठी वापर करेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडीबद्दल मित्र मंडळ व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.



