नवीन नांदेड l मौ. बळीरामपुर ता. जि. नांदेड येथे सीएल-३ अनुज्ञाप्ती क्रमांक ८९ श्री. आनंदराव लक्ष्मणराव घंटलवार व त्यांचे भागीदार यांच्या नांवे असलेले देशी दारुचे दुकान स्थलांतरीत करण्यात यावे अन्यथा 1एप्रिल रोजी चंदासिंग चौक व माता रमाई आंबेडकर चौक येथे रस्ता रोको व 10 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


दिलेल्या निवेदनात बळीरामपुर येथे ग्रामस्थाम. यांच्या वतीने मौ. बळीरामपुर ता.जि.नांदेड येथील श्री. आनंदराव लक्ष्मणराव घंटलवार व त्यांचे भागीदार यांच्या नांवे असलेले आनंद कंट्री बार हे सीएल-३ अनुज्ञाप्ती क्रमांक ८९ या दुकाना संदर्भात ग्रामस्थानच्या वारंवार तक्रारी होत.



असल्यामुळे दि.३१/०८/२०२३ रोजी ग्राम सभा घेवुन दुकान स्थालांतर करण्या संदर्भात गांवकऱ्यांनी ठराव घेतला असून या संदर्भातील प्रस्ताव आपल्या कार्यालयात दाखल केला आहे. परंतु एक वर्षापासुन सदरील प्रस्तावावर दुकान स्थालांतर करण्या संदर्भात आपल्या कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यांत आली नाही. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर ग्रामस्थानच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते.


तरी सुध्दा आपल्या कार्यालयास योग्य तो प्रस्ताव सादर केल्यानंतर सुध्दा आज रोजी पर्यंत दुकान स्थालांतरीत करण्यात आलेले नाही. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दि.०१ एप्रिल २०२५ पर्यंत आपण आपल्या कार्यालयाकडून दुकान स्थलांतरीत न झाल्यास ग्रामीण पोलीस स्टेशनचा हद्दीतील माता रमाई आंबेडकर कॉर्नर व चंदासिंग कॉर्नर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यांत येईल.

या आंदोलना दरम्यान जो कांही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड हे सर्वस्वी जबाबदार असतील. या उपर जर कार्यवाही नाही झाली तर सरपंच म्हणुन मी आपल्या कार्यालया समोर दि.१० एप्रिल २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल असे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिले आहे.


