हिमायतनगर | हिमायतनगरचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी २ वाजता मुस्लिम समाजाच्या रितिरिवाजानुसार दफनविधी करण्यात येणार आहेत.


शेख चांद शेख महेबूब यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी पोटतीडकीने झटत काम केले. सर्वसामान्यांशी जवळीक साधत त्यांनी हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा टिकवून ठेवण्याचा संदेश देत आपली राजकीय व समाजिक कारकीर्द पूर्ण केली, त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक, चांगला, सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्त्व सोडून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, तसेच कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करत अनेकांनी शेख चांद भाई यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




