नांदेड| रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदीग्राम ही एक विविध सामाजिक उपक्रमासाठी जाणल्या जाणारी संस्था आहे. दरवर्षी नवीन अध्यक्ष सचिव व बोर्ड ऑफ डायरेक्टर सभासद निवडून एक टीम बनून शहर तसेच ग्रामीण भागातील मधील सामाजिक विविध उपक्रम राबवित असतात.
त्याप्रमाणे 2024-25 चे रोटरी क्लब नांदेड चे नवीन अध्यक्ष, रो. डॉ. संजय पतंगे, सचिव, रो. सुरेश अंबुलगेकर तसेच रोटरी क्लब नंदिग्रामच्या अध्यक्ष रो. रेखा गरुडकर व सचिव डॉक्टर सुरभी राठोर त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर चे पूर्ण सभासदाचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी हॉटेल सिटी सिंफोनी, नमस्कार चौक नांदेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट चे डि.जी.ई. रो. सुधीर लातूर, नांदेड रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो. नजीब पठाण व रोटरी क्लबचे नंदिग्राम चे असिस्टंट गव्हर्नर रो. मुरलीधर भुतडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
2023-24 चे मावळते अध्यक्ष रो. प्रशांत देशमुख व नंदिग्राम च्या मावळत्या अध्यक्ष रो . दिपाली पालीवाल यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले, सेक्रेटरी रो. डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल यांनी मागील वर्षात घेतलेल्या विविध उपक्रम मोफत कान, नाक, घशाचे शस्त्रक्रिया, धर्माबाद येथे झालेले मोफत जयपुर फूट कृत्रिम वाटप, टी. आर. एफ सेमिनार मधील अनुभव, पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनविणे स्पर्धा, नांदेड, चाकूर, मुखेड, अहमदनगर फेलोशिप मीट, किनवट येथे एन.आय. सी. यु. ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट, आयुष्यमान भारत जोडो नोंदणी अभियान, 20 शाळांना मोफत कपाट व पुस्तके लायब्ररी वाटप, सी आर एस ग्रँड मधून 9 गरजू महिलांना मोफत आटा चक्की गिरणी वाटप, मोफत दंत तपासणी शिबिर असे विविध वेगवेगळे उपक्रम दरवर्षी राबविले.
मावळते अध्यक्ष रो. प्रशांत देशमुख व सचिव रो. डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल यांच्या वर्षभारतील विविध प्रकारचे प्रोजेक्ट यशस्वीरित्या करून दाखवल्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वाती हेरकल यांनी रोटरी क्लब नांदेड ला 1) पी एच एफ चॅलेंज डायनामिक क्लब अवार्ड. (2) एपीएफ गिविंग क्लब गोल्डन साईटेशन 5 पोझिशन अवार्ड. (3) फॉर स्पॉन्सरींग अ ग्लोबल ग्रँड इन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 रोटरी अमृतधारा मिल्क बँक नांदेड अवार्ड. (4) 100% रिटेन्शन विथ मेंबरशिप ग्रोथ अवार्ड. (5) 1st पोझिशन बेस्ट चाईल्ड हेल्थकेअर ट्रॉफी एन.आय.सी.यु. प्रोजेक्ट किनवट अवॉर्ड असे पाच विविध प्रकारचे अवार्ड देऊन सन्मानित केले.
नवीन अध्यक्ष रो. डॉ. संजय पतंगे व नंदिग्रामच्या अध्यक्ष रेखा गरुडकर यांनी सुरुवातीस बोर्ड ऑफ डायरेक्टर यांची ओळख करून दिली. या वर्षी 10 नवीन सभासद रोटरीशी जुळल्या गेले. नवीन अध्यक्ष यांनी येणाऱ्या वर्षात नवीन वेगवेगळे उपक्रम घेणाऱ्या कार्याची माहिती दिली. असिस्टंट गव्हर्नर रो. नजीब पठाण व रो. मुरलीधर भुतडा यांनी रोटरी बद्दल सर्वांना माहिती दिली तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट चे डि.जी.ई. रो. सुधीर लातूरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे डी.जी. ई. रो. सुधीर लातूरे यांचे मार्गदर्शन आम्हासाठी मोलाचे ठरले. नक्कीच त्यांचे विचार आम्ही सोबत ठेवून येणाऱ्या वर्षात चांगले कार्य करून दाखऊ असे नवीन सचिव रो. सुरेश अंबुलगेकर यांनी आभार प्रदर्शन करत राष्ट्रगीतने या कार्यक्रमाचा समारोप केला.