Rotary Club Inauguration Ceremony : रोटरी क्लब पदग्रहण सोहळा थाटा माटात संपन्न -NNL
नांदेड| रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदीग्राम ही एक विविध सामाजिक उपक्रमासाठी जाणल्या जाणारी संस्था आहे. दरवर्षी नवीन अध्यक्ष सचिव व बोर्ड ऑफ डायरेक्टर सभासद निवडून एक टीम बनून शहर तसेच ग्रामीण भागातील मधील सामाजिक विविध उपक्रम राबवित असतात.
त्याप्रमाणे 2024-25 चे रोटरी क्लब नांदेड चे नवीन अध्यक्ष, रो. डॉ. संजय पतंगे, सचिव, रो. सुरेश अंबुलगेकर तसेच रोटरी क्लब नंदिग्रामच्या अध्यक्ष रो. रेखा गरुडकर व सचिव डॉक्टर सुरभी राठोर त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर चे पूर्ण सभासदाचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी हॉटेल सिटी सिंफोनी, नमस्कार चौक नांदेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट चे डि.जी.ई. रो. सुधीर लातूर, नांदेड रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो. नजीब पठाण व रोटरी क्लबचे नंदिग्राम चे असिस्टंट गव्हर्नर रो. मुरलीधर भुतडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन...
