उमरखेड| सुरेंद्र कोडगिरवार यांनी रोटरी क्लब मध्ये सतत २५ वर्षे सेवारत असल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार फेटा शाल। सन्मान चिन्ह देऊन रोटरी क्लबचे प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी उपप्रांतपाल अरुण कावडकर, समन्वयक किशोर राठी,रोटरी क्लब उमरखेड चे संस्थापक अध्यक्ष डॉ या. मा. राऊत,अध्यक्ष दत्ता गंगासागर,सचिव चेतन माहेश्वरी, कैलास उदावंत ,व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना सुरेंद्र कोडगिरवार। म्हणाले रोटरी क्लब साठी हे वर्ष रोप्ममोहत्सवी असल्याने या वर्षी विशेष प्रकल्प राबउन क्रीडा, शिक्षण, आरोग्य,कृषी ,याशिवाय विविध क्षेत्रात भरीव। कामगिरी करून जिल्हा स्तरावर रोटरी क्लब उमरखेड चे नाव लौकिक करू असे मत कोडगिरवार यांनी व्यक्त केले