उमरखेड, अरविंद ओझलवार। आमदार नामदेव ससाने यांनी विधानसभेतील विकासात्मक बाबीवर पुढाकार घेत उमरखेड विधानसभेतील उमरखेड व महागाव तालुक्यातील शासकीय कार्यालया अंतर्गत कार्यरत प्रलंबित व प्रस्तावीत कामे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व रेल्वे प्रकल्पाची कामे इत्यादी कामाचा आढावा यासोबतच शेतकऱ्यांच्या निगडित असलेल्या प्रश्नावर आमदार नामदेव ससाने यांनी तब्बल 30 कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक काल दिनांक 26 रोजी उमरखेड येथील राजे संभाजी उद्यान गार्डन हॉल येथे घेतली .या बैठकीत सर्व कामे ही वेळेवर करण्याचे आदेश यावेळी आमदार नामदेव ससाने यांनी अधिकाऱ्यांना दिलीआहे .उमरखेड विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आमदारांनी सर्व झाडून पुसून कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असून या बैठकीत प्रामुख्याने रखडलेल्या रेल्वे महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग 361 तसेच शेतकऱ्यांच्या निगडित प्रश्नावर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले .
उमरखेड विधानसभेतील उपविभागीय पोलिस अधिकारी ,तहसील कार्यालय उमरखेड – महागाव ,गटविकास अधिकारी उमरखेड -महागाव तालुका , कृषी अधिकारी उमरखेड – महागाव , पोलीस निरीक्षक उमरखेड – महागाव – पुसद ग्रामीण – पोफाळी – बिटरगाव – दराटी – सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उमरखेड -महागाव ,उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय महागाव -उमरखेड ,तालुका वैद्यकीय अधिकारी उमरखेड – महागाव , गटशिक्षणाधिकारी उमरखेड -महागाव, उपकार्यकारी अभियंता उमरखेड – महागाव, प्रकल्प अधिकारी उमरखेड – महागाव ,कार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण उमरखेड महागाव, सहायक निबंधक सहकारी संस्था उमरखेड – महागाव, उपाभियंता जी.प . बांधकाम विभाग उमरखेड – महागाव , कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक पाच -दोन हदगाव -उमरखेड ,कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे पुसद, उपवनरक्षक प्रादेशिक वन्यजीव – सामाजिक , वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक उमरखेड -महागाव, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव सोनदाभी – दराटी – बिटरगाव – कोरटा , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद, कृषी अधिकारी पंचायत समिती उमरखेड – महागाव, पशुसंवर्धन अधिकारी उमरखेड – महागाव, प्रकल्प संचालक यवतमाळ – नांदेड , कार्यकारी अभियंता रेल्वे प्रकल्प वर्धा यवतमाळ – नांदेड , कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पुसद, उपविभागीय अधिकारी लोअर पुस प्रकल्प महागाव , पुसद उपकार्यकारी अभियंता जल मिशन ,वाहतूक शाखा उमरखेड – महागाव या 30 कार्यालयाच्या प्रमुखासोबत आमदार ससाणे यांनी या बैठक घेतली.
आढावा बैठकीत बोलताना यवतमाळ नांदेड प्रकल्प संचालक यांच्याकडे वर्ग करण्यात आलेल्या एकूण गावांपैकी किती गावांमध्ये लवादामध्ये वाढीव मोबदला निश्चित केलेला आहे. वाढीव मोबदल्यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील प्रलंबित कामांची स्थिती काय आहे ?रेल्वे प्रकल्पात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत बोलताना ससाने म्हणाले की , न्यायाधिकारणात किती प्रकरणांमध्ये वाढीव मोबदला निश्चित केलेला आहे व तो किती भुधारक यांना वितरित करण्यात आला आहे . वितरीत करण्यात आला नसेल तर त्याची नेमकी कारण काय? रेल्वे प्रकल्पासाठी ज्या जमिनी अधिकृत केलेले आहेत त्यामध्ये वाढीव क्षेत्र ताब्यात घेण्यात येत आहेत मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना संबंधित शेतकऱ्यांना करण्यात येत नसून अद्यापही त्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
असे अधिकाऱ्यांना यावेळी ठणकावून सांगून आमदार नामदेव ससाने म्हणाले की , प्रत्येक कार्यालया अंतर्गत असलेल्या अर्धवट कामांची माहिती काय आहे ,विकास कामे रखडली असेल तर का रखडली , प्रत्येक कार्यालयातील नागरिकांना सुविधांच्या योजनांची माहिती काय आहे ,यासह प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेची एकूण किती प्रस्ताव झाली आहे .किती शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे . पैकी किती शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाली आहे . प्रगतीवर किती फाईली आहेत यासह तालुक्यातील शेतकरी यांना ज्यादा दरात बि बियाणे विक्री केल्या जात असल्यास किंवा कृत्रीम तुटवड्या संदर्भात काय उपाय योजना करण्यात आले आहेत .
या सर्व बाबींचा आढावा घेत आमदार नामदेव ससाणे यांनी तब्बल दहा तास अधिकाऱ्यांना केवळ एकच विषय सांगितला की उमरखेड महागाव विधानसभेतील प्रत्येक नागरिकांना न्याय देण्याचे काम सर्व अधिकार्याकडून होणे गरजेचे आहे . महाराष्ट्र शासनाकडून उमरखेड तालुक्यासाठी करोडोचा निधी प्रत्येक विभागासाठी खेचून आणून देखील ते काम अधिकारी वर्ग इमाने इतबारे पार पाडत नसल्याच निदर्शनास आले आहे . यापुढे असे आढळून आल्यास संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे निश्चितच आहे .एवढे सांगून आमदार ससाणे यांनी सर्व अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या निधीची विकास कामे ही इमानदारीनी करावी असे निर्देश देऊन यापुढे सामान्य नागरिक शेतकऱ्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे अशा सूचना दिल्या.
सांगितलेल्या या आढाव बैठकीतल्या सर्व प्रश्नांचे सर्व माहितीचे येत्या ७ दिवसात प्रत्येक अधिकाऱ्यांनी अहवाल आमदार नामदेव ससाणे यांच्याकडे सादर करायचा आहे. तसे न झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांच्या , शेतमजुरांच्या व सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास त्यांच्यावर दंडात्मक व कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी आमदार नामदेव ससाने यांनी दिला आहे . यावेळी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व उमरखेड विधानसभेतील सर्व शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते .