नांदेड| येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख हमीद यांचे अल्प आजाराने आज दि.16 जानेवारी 2026 रोजी पहाटे निधन झाले.
मृत्यू समयी ते 63 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


नांदेड पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात त्यांनी चालक म्हणून काम केले होते.व्हीव्हीआयपी साठी राखीव असलेल्या कारचे ते चालत होते.

माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी यांचे वाहन चालक म्हणून त्यांनी काम केले होते.अनेक पत्रकारांशी हमीद यांची अत्यंत स्नेहाचे संबंध होते.


त्यांच्या पार्थिवाचा दफन विधी शिवाजीनगर जवळील नई आबादी येथील मशिदी लगतच्या स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.


